Ad will apear here
Next
वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर कॅमेरा
अहमदाबाद : पोलिसांवर होणारे भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचे आरोप लक्षात घेऊन आणि एकंदरीतच पोलीस विभागाच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी पोलिसांच्या गणवेशावर छोटा कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात पोलिसांनी हा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. यानुसार सुरुवातीस ६४० पोलिसांच्या गणवेशावर असे कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर लावण्याची पोलीस विभागाची योजना आहे. 

दंगली, राजकीय सभा, आंदोलने, मारामाऱ्या, छापेमारी अशा प्रकारच्या घटनांमध्ये एक सबळ पुरावा म्हणूनही या कॅमेराचा उपयोग होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. तसेच या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या हालचालींवरही नजर ठेवता येणार आहे. पोलिसांवर नजर ठेवण्याबरोबरच वाहतुकीचे नियम मोडणारे, भ्रष्टाचार करणारे आदींविरोधात पुरावे जमा करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम ठरणार आहे. अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हा कॅमेरा साधारणतः मोबाइलच्या आकाराचा असेल. तो पोलिसांच्या छातीवर आणि खांद्यावर लावण्यात येणार आहे. तसेच या कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंगसह उत्तम प्रतीचे फोटो काढण्याचीही सुविधा असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी, सभांच्या ठिकाणी, तसेच विविध मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी हे कॅमेरे पोलिसांच्या गणवेशावर लावले जातील. विशेष म्हणजे कोणत्याही पोलिसाला हा कॅमेरा बंद करण्याची परवानगी नसेल. तसे केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सहआयुक्त आर. जे. सवानी यांनी सांगितले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XYVMBA
Similar Posts
गीता जोहरी बनल्या गुजरातच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक अहमदाबाद : गुजरातमध्ये पोलीस महासंचालकपदी पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. गुजरात हाउसिंग कॉर्पोरेशनच्या सध्याच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या गीता जोहरी आता गुजरातच्या पोलीस महासंचालक होणार आहेत. जोहरी या १९८२च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. याधीचे पोलीस महासंचालक पी
चंद्रकांत मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील रयत सेवक चंद्रकांत सीताराम मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पातळीवरील ‘अॅवॉर्ड ऑफ मेरीट’ हा पुरस्कार मिळाला. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात नुकतीच नववी राष्ट्रीय टीचर्स सायन्स काँग्रेस पार पडली.
दिवस खारीचा वाटा उचलायचे! गुजरातमधील मातृभाषा अभियान या चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पटेल यांचे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला निधन झाले. गुजराती भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या या चळवळीबद्दल...
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language